SBI चा ग्राहकांना धक्का! इंटरनेट बँकिंगसह ‘या’ सेवा बंद राहणार

SBI चा ग्राहकांना धक्का! इंटरनेट बँकिंगसह ‘या’ सेवा बंद राहणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)मध्ये खाते असणा-या ग्राहकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. SBI च्या YONO, नेट बँकिंग आणि मोबाईल ॲप सेवा उद्या, शनिवारी (दि. 23) काही काळ बंद राहतील. त्यामुळे या सेवा SBI चे ग्राहक वापरू शकणार नाहीत. तथापि, ग्राहक UPI Lite आणि ATM द्वारे सेवांचा वापर करू शकतात, अशी माहिती बँकेने दिली आहे.

SBI ने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की 23 मार्च 2024 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 01:10 ते दुपारी 02:10 दरम्यान इंटरनेट संबंधित सेवा उपलब्ध नसतील. या काळात ग्राहक इंटरनेट बँकिंग, YONO Lite, YONO Business Web आणि Mobile App, YONO आणि UPI या सेवा वापरू शकणार नाहीत. मात्र, UPI Lite आणि ATM सेवा वापरता येतील.

कोणत्याही समस्येसाठी 'येथे' संपर्क साधा

बँकेच्या म्हणण्यानुसार, ग्राहक कोणत्याही माहितीसाठी किंवा मदतीसाठी SBI टोल फ्री क्रमांक 1800 1234 आणि 1800 2100 वर कॉल करू शकतात. वेबसाइटला भेट देऊन तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती मिळवू शकता.

UPI चालेल की नाही?

शनिवारी या वेळेत कोणताही ग्राहक UPI वापरू शकणार नाही, अशी माहिती बँकेने दिली आहे. तथापि ते UPI Lite वापरून पेमेंट करू शकतात. यासोबतच ते एटीएम मशिनमधून पैसे काढून पेमेंट करू शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news