सावित्री जिंदाल बनल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला

सावित्री जिंदाल बनल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ओ. पी. जिंदाल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. 2023 मध्ये कमाईच्या बाबतीत त्यांनी बड्या-बड्या उद्योगपतींना मागे टाकले आहे. सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत 9.6 अब्ज डॉलरची मोठी वाढ झाली आहे. ही वाढ अंबानी आणि बिर्ला यांच्यासारख्या दिग्गजांच्या संपत्तीतीत वाढीपेक्षा बरीच अधिक आहे. अर्थात, याचवेळी जिंदाल कुटुंब कायदेशीर कचाट्यातही सापडलेले आहे.

मुंबई पोलिसांनी सावित्री जिंदाल यांचा मुलगा आणि जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सावित्री जिंदाल यांना 9 मुले आहेत. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचल्या आहेत. सावित्री जिंदाल यांचे पती जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओमप्रकाश जिंदाल यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर सावित्री जिंदाल यांनी समूहाची जबाबदारी स्वीकारली.

सावित्री जिंदालच्या समूहामध्ये जेएसडब्ल्यू स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर, जेएसडब्ल्यू एनर्जी, जिंदाल सॉ, जिंदाल स्टेनलेस आणि गुंतवणूक कंपनी जेएसडब्ल्यू होल्डिंग सारख्या सूचीबद्ध कंपन्यांचा समावेश आहे. ओपी जिंदाल ग्रुपकडे पोर्ट ऑपरेटर जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरची 83 टक्के मालकी आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 2023 मध्ये सुमारे 5 बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती 92.3 अब्ज डॉलर्स आहे.

यंदा अब्जाधीशांची कमाई किती ?

जिंदाल समुहानंतर एचसीएल टेकचे शिव नाडर या यादीत दुसर्‍या स्थानावर आहेत. 2023 मध्ये त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 8 अब्ज डॉलरने वाढली आहे. शिव नाडर यांची संपत्ती सुमारे 32.6 अब्ज डॉलर आहे. डीएलएफ रियल्टी टायकून केपी सिंह यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. 2023 मध्ये त्यांची संपत्ती 7 अब्ज डॉलरने वाढली. त्यानंतर एकूण संपत्ती 15.4 अब्ज डॉलर झाली. कुमार मंगलम बिर्ला आणि शापूर मिस्त्री या दोघांच्या संपत्तीत 2023 मध्ये 6.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 5.2 अब्ज डॉलर आणि सन फार्माचे एमडी दिलीप सांघवी यांची संपत्ती 4.7 बिलियन डॉलरने वाढली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news