राहुल गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा दावा, सावरकर कुटुंबियांची बदनामीची तक्रार
पुणे : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणींत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. मोदी नावामुळे झालेल्या वादानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली. आता स्वातंत्र्यवीर सावरकरांविरूद्ध इंग्लडमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पुणे न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी हा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
इंग्लंडमध्ये एका कार्यक्रमात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी खोटी माहिती देऊन त्यांचा अपमान केला. सावरकर यांच्याबद्दलची मते कलुषित करण्याच्या दृष्टीने आणि बदनामी करण्यासाठी गांधी यांनी अपमानजनक वक्तव्य केले आहे. त्याची शिक्षा राहुल गांधींना मिळावी यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही कुटुंबीयांनी घेतला असल्याचे सात्यकी सावरकर यांनी सांगितले.