सौदी अरेबिया उभारणार स्वप्नांचे शहर!

सौदी अरेबिया उभारणार स्वप्नांचे शहर!
Published on
Updated on

रियाद : सौदी अरेबिया अलीकडे आपल्या शहरांचे रूपडे बदलण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात व्यस्त आहे. सौदीने अलीकडेच लाल सागरातील सुनसान बेटावर नियोम योजनेंतर्गत लक्झरी रिसॉर्ट उभे करण्याचा निर्णय घेतला असून, शुशाह बेटावर 650 फूट लांबीचे हॉटेल उभे केले जाईल. इतकेच नव्हे तर अगदी पाण्याखालीही एक म्युझियम उभारले जाणार आहे. नियोम योजना ही सौदीचे राजे मोहम्मद बिन सलमान यांचे ब्रेन चाईल्ड मानले जाते.

या अविश्वसनीय योजनेचे काम यापूर्वीच सुरू केले गेले असून त्यात एकाच लाईनमधील शहर असेल. शुशाह बेटाची अलीकडील काही छायाचित्रे जाहीर केली गेली असून पर्यटकांनी याला भेट द्यावी, यासाठी सौदीने प्रयत्न सुरू केले आहेत. तूर्तास, शुशाह द्वीपमध्ये 250 एकर जागा रिकामी असून त्यावर देखील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे केले जाणार आहेत.

मॉडेल छायाचित्रात असे स्पष्टपणे दिसून येते की, बेटावर रिसॉर्ट उभे करण्याची योजना आहे आणि ज्यावेळी ते पूर्ण होईल, त्यावेळी ते ओळखणे कठीण होईल. पर्यटक येेथे नावेने येऊ शकतील आणि अगदी दोन विमाने उतरतील, याचीही तजवीज केली जाणार आहे. बेटावर पोहोचल्यानंतर आलिशान हॉटेलमधील 300 रूम उपलब्ध असतील. शिवाय, लक्झरी बुटिक हॉटेल, व्हिला अपार्टमेंटचाही पर्याय असणार आहे. या बेटावर पाण्याखाली एक म्युझियम देखील उभे केले जाणार आहे. या म्युझियममुळे पर्यटकांना पाण्याखालचे जग पाहता येईल, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 2025 पर्यंत कोरल गार्डन उभे करण्याची सौदी राजेंची महत्त्वाकांक्षा असून लवकरच याला गती दिली जाईल, असे जाहीर केले गेले आहे. यासाठी पर्यटकांना काय किंमत मोजावी लागेल, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news