Satara News | पुसेसावळीत आक्षेपार्ह पोस्टवरून जाळपोळ, एकाचा मृत्यू, १४ जण जखमी

Satara News | पुसेसावळीत आक्षेपार्ह पोस्टवरून जाळपोळ, एकाचा मृत्यू, १४ जण जखमी

खटाव : पुढारी वृत्तसेवा, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेसावळी येथे समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर रविवारी (दि.१०) रात्री उशिरा जाळपोळीची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १३ ते १४ जण जखमी झाले आहेत. ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचा मृतेदह ताब्यात घेण्यास मुस्लिम समाजाने नकार दिला आहे. या प्रकरणी विक्रम पावस्कर यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. (Satara News)

याबाबत माहिती अशी, काही दिवसांपूर्वी पुसेसावळी येथे काही युवकांनी समाज माध्यमांवर देव देवतांच्या आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्या होत्या. प्रकरणी पुसेसावळीत अंतर्गत धुसपुस सुरू होती. त्यातच रविवारी दोन युवकांनी इंस्टाग्राम सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे आढळून आले. त्यामुळे पुसेसावळी व परिसरातील युवकांनी आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या युवकांच्या घरावर दगडफेक केली. तसेच त्यांच्या व्यवसायाच्या गाड्या रस्त्यावर पाडून मोडतोड केल्या. रात्री उशिरा जाळपोळही करण्यात आली.

यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. स्थानिक पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रण आणली होती; परंतु परिसरातून मोठ्या प्रमाणावर युवक जमा झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. सातार्‍यातून तातडीने पोलिस कुमक आल्याने जमाव पांगवण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस शांततेचे आवाहन करत आहेत. या घटनेने पुसेसावळीतील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान, या घटनेत १३ ते १४ जण जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक होती. त्याचा आज मृत्यू झाल्याने तणाव वाढला आहे. (Satara News)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news