सातारा : पुढारी वृत्तसेवा – साताऱ्याचे भाजपचे उमेदवार छ. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. (Satara Lok Sabha ) यावेळी साताऱ्यात उदयनराजेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.(Satara Lok Sabha)
गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली निघाली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळी ११ वाजता जलमंदिर पॅलेस येथून उदयनराजेंच्या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाई, महेश शिंदे, जयकुमार गोरे, महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.