satara crime : साताऱ्यातील जेलमध्ये राडा, पोलिस अधिकाऱ्याची कॉलर पकडून मारहाण

satara crime : साताऱ्यातील जेलमध्ये राडा, पोलिस अधिकाऱ्याची कॉलर पकडून मारहाण

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदिवानाने राडा करत पोलिसाची कॉलर धरुन मारहाण केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली आहे. (satara crime)

काशीनाथ उर्फ काश्या सोनबा जाधव (वय ३७, रा. आंधळी ता.माण) असे संशयित आरोपीचे नाव असून सध्या तो जिल्हा कारागृहात बंदीवान आहे. याप्रकरणी जेल पोलिस रणजित गोपीचंद बर्गे (वय ४०) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. ९ व १० रोजी अशा दोन टप्प्यात घडली आहे. दि.९ रोजी दुपारी तक्रारदार रणजित बर्गे जेलमध्ये कर्तव्य बजावत असताना संशयिताने 'तुला लय मस्ती आली. तुझ्याकडे बघतो', असे म्हणत जीव मारण्याची धमकी देवून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे जेलमध्ये खळबळ उडाली. इतर पोलिसांनी धाव घेवून संशयिताला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती कारागृह अधीक्षक यांना दिल्यानंतर त्यांनी दि. १० रोजी संबंधित पोलिस व संशयिताला कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले. (satara crime)

दुसर्‍यावेळी प्राथमिक चौकशी सुरु असतानाच पुन्हा संशयित आरोपी काशीनाथ जाधव याने जेल पोलिस रणजित बर्गे यांची कॉलर धरत धक्काबुक्की केली. अखेर संशयिताला ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news