Satara BJP : रणजितसिंह निंबाळकरांना साता-याचा खासदार करा, पावसकरांच्या मागणीने उदयनराजेंच्या गोटात खळबळ

Satara BJP : रणजितसिंह निंबाळकरांना साता-याचा खासदार करा, पावसकरांच्या मागणीने उदयनराजेंच्या गोटात खळबळ
Satara BJP : रणजितसिंह निंबाळकरांना साता-याचा खासदार करा, पावसकरांच्या मागणीने उदयनराजेंच्या गोटात खळबळ
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

नगरपंचायत निवडणुकांच्या निमीत्ताने सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला पहायला मिळत आहे. मंगळवारी फलटण तालुका भाजपा संपर्क कार्यालयाचं उदघाटण झालं यावेळी बरीच राजकीय बँटींग झाल्याचं पहायला मिळालं. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी एक मोठं विधान केलं. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे पुढच्याचेळी साता-याचे खासदार व्हावेत अशी इच्छा व्यक्त करुन दाखवली. हे विधान खूप मोठ मानलं जात आहे.

साता-याचे विद्यमान खासदार राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील असले तरी त्यांच्या विरोधात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपमधून निवडणूक लढविली होती. उदयनराजेंचा या ठिकाणी मोठा पराभव झाला होता. उदयनराजे भोसले हे सध्या भाजपाचे राज्यसभेचे खासदार आहेत. असं असताना पावसकरांनी केलेल्या या विधानाला एक वेगळं महत्व प्राप्त झालंय.

भाजपात सगळं अलबेल सुरू आहे, असं काही या विधानावरून दिसत नाहीये. सातारा जिल्हा भाजपाला आता उदयनराजे नकोत का? असा सवाल अनेकांना पडला आहे. पहिला राष्ट्रवादी काँग्रेसमधून खासदार झालेल्या उदयनराजेंनी भाजपातील काही नेत्यांच्या आग्रहास्तव स्वत:ची खासदारकी सोडून अगदी सहा महिन्यात दुस-यांदा निवडणूक लढविली. भाजपाच्या आग्रहाखातर हातातली सत्ता सोडून भाजपवासी झालेल्या उदयनराजेंना भाजपातीलच लोक आता डावलायला लागल्याचं चित्र आहे. पुढील लोकसभेच्या निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीची मागणी करून भाजपा जिल्हाध्यक्षांनी एका वेगळ्याच वादाला तोंड फोडलंय. ही मागणी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांकडे केली असल्यामुळे याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहिलं जातं आहे.

खासदार उदयनराजेंना सातारा जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळं महत्त्व आहे. तसंच त्यांचा फॅन फॉलोअर्स सुद्धा मोठा आहे. मग असं असताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदयनराजेंना विचारात न घेता असं बोललेच कसे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष वरिष्ठ नेत्यांची बोली तर बोलू लागले नाहीत ना? की उदयनराजेंचा हवा तसा उपयोग राज्याच्या राजकारणात होत नसल्यामुळे आता उदयनराजेंना बाजूला करण्याचा डाव काही नेत्यांचा तर नाही ना? असे अनेक प्रश्न या विधानामुळे उदयनराजेंच्या पाठीराख्यांना आणि कार्यकर्त्यांना पडल्या शिवाय राहणार नाहीत. विक्रम पावसकरांनी केलेल्या या विधानाची चर्चा आता साता-यातील राजकीय गोटात रंगू लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news