Zara Hatke Zara Bachke : सारा-विकीच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत २२ कोटींचा गल्ला

Zara Hatke Zara Bachke
Zara Hatke Zara Bachke
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : २ जूनला रिलीज झालेल्या विकी कौशल-सारा अली खानच्या 'जरा हटके जरा बचके' चित्रपटाने तीन दिवसांत तब्बल २२ कोटींचा गल्ला जमवला आहे. जवळपास ५० कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने दोन दिवसात १३ कोटी रुपयांचे कलेक्शन केलं. (Zara Hatke Zara Bachke ) 'जरा हटके जरा बचके'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ५.४९ कोटी रुपयांचे कलेक्शन केलं होतं. तर दुसऱ्या दिवशी कमाईत ३० टक्के वाढ झालेली दिसली. शनिवारी ७.२० कोटींची कमाई झाली. दोन दिवसात १२.६९ कोटींचे कलेक्शन केले. (Zara Hatke Zara Bachke )

२०२३ मधील १० वा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट

'जरा हटके जरा बचके' २०२३ या १० वी सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट बनला आहे. या लिस्टमध्ये पठान, किसी का भाई किसी की जान, तू झूठी मैं मक्कार, फास्ट १०, भोला, एंट मॅन एंड द वास्प- क्वांटमेनिया, दे केरला स्टोरी, गार्जियन्स ऑफ द गैलेक्सी आणि शहजादा यांचा समावेश आहे.

Day 1 – 5.49 Crs
Day 2 – 7.20 Crs
Day 3 – 9.90 Crs
TOTAL – 22.59 Crs ✅

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news