Zara Hatke Zara Bachke Trailer: विक्की कौशल-साराने पार केल्या रोमान्सच्या सर्व मर्यादा

Zara Hatke Zara Bachke Trailer: विक्की कौशल-साराने पार केल्या रोमान्सच्या सर्व मर्यादा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सारा अली खान आणि विक्की कौशलचा आगामी चित्रपट जरा हटके जरा बचकेचा ट्रेलर रिलीज झालाय. सारा विकी एकमेकांसोबत पहिल्यांदाच काम करत आहेत. विक्की आणि साराचा या चित्रपटामध्ये नटखट अंदाज पहायला मिळेल. (Zara Hatke Zara Bachke Trailer) हिंदी चित्रपट इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते विक्की कौशल आणि सारा अली खान सध्या 'जरा हटके जरा बचके' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झालाय. (Zara Hatke Zara Bachke Trailer)

'जरा हटके जरा बचके' विक्की कौशल- सारा अली खान यांचा चित्रपट पुढील महिन्यात रिलीज होण्यास तयार आहे. आधी अशी चर्चा होती की, चित्रपट जवानमध्ये चित्रपटाची रिलीज अंतिम तारीख ठरली नव्हती. आता तारीख समोर आली असून 'जरा हटके जरा बचके' २ जून रोजी रिलीज होणार आहे. त्याआधी शाहरुख खानचा चित्रपट 'जवान' देखील रिलीज होणार होता.

धमाकेदार ट्रेलर

'जरा हटके जरा बचके' लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलं आहे. दिनेश विजान आणि ज्योती देशपांडेने चित्रपटाची निर्मिती केलीय. चित्रपटाची स्टोरी इंदौरच्या दोन प्रेमींवर आधारित आहे. ही कहाणी कपिल-सौम्याची आहे. कॉलेजमध्ये असताना दोघे प्रेमात पडतात. परिवाराच्या परवानगीने दोघे लग्न करतात.

ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, लग्नाच्या सुरुवातीच्या काळात दोघांमध्ये प्रेम होतं. पण, कालानुरुप, रोमान्सदेखील कमी होत जातं. इतकी वेळ वाईट येते की, दोघेही एकमेकांचे तोंड देखील पाहणे पसंत करत नाहीत. घटस्फोटानंतर त्यांना वेगवेगळ्या अंदाजात आयुष्य घालवायचं आहे. विशेष म्हणजे, कपिल आणि सौम्याचा घटस्फोट दोघांमध्येच नाही तर सहपरिवार होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news