sara ali khan and shubhman gill : ‘कॉफी विथ करण’मध्ये सारा अली खानचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘शुभमन गिल आणि मी’

sara ali khan and shubhman gill
sara ali khan and shubhman gill
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या पूर्वाश्रमीच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केल्यानंतर 'कॉफी विथ करण' या शो वर आणखी काही रिलेशनबाबत मोठे खुलासे झाले आहे. 'कॉफी विथ करण'चा ८ वा सीजन सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. आतापर्यंत या शोचे दोन भाग रिलीज झाले आहेत. या भागात सारा अली खान आणि क्रिकेटपटू शुभमन गिल या दोघांच्या नात्याबाबत अनेक खुलासे झाले आहेत. आता या शोचा तिसरा भागही प्रदर्शित होणार आहे. या एपिसोडमध्ये बॉलीवुड अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खान एकत्र दिसणार आहेत. या एपिसोडमध्ये दोघींनीही त्यांच्या लव्ह लाईफ आणि अफेअर्सबाबत अनेक खुलासे करणार आहेत. (sara ali khan and shubhman gill)

चुकीच्या साराबाबत चर्चा सुरु आहे – सारा अली खान

एपिसोडचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये सारा अली खान भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना दिसत आहे. शुभमनसोबत तिचे संबंध होते की नाही? हे तिने स्पष्ट केले आहे. 'कॉफी विथ करण'च्या प्रोमोमध्ये सारा अली खानने शुभमन गिलसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले. शिवाय तिने सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्यातील नात्याची विनोदाने पुष्टीही केली. (sara ali khan and shubhman gill)

व्हिडिओमध्ये करण जोहर सारा अली खानला विचारतो की, सारा अली खानच्या शुभमन गिलसोबत डेटिंगच्या अफवा होत्या का? या प्रश्नाचे उत्तर देताना सारा म्हणाली, तू चुकीच्या सारा बाबत बोलत आहेस. संपूर्ण जग चुकीच्या साराच्या मागे लागले आहे. आमच्यामध्ये कोणतेही नाते नाही जे चर्चेत आहे. यादरम्यान सारा अली खानने अनन्या पांडे 'नाइट मॅनेजर' म्हणजेच आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याचा खुलासा केला. (sara ali khan and shubhman gill)

सारा अली खान आणि सारा तेंडुलकर दोघींबाबतही चर्चा

शुभमन गिलचे नाव सारा अली खान आणि सारा तेंडुलकर या दोघींसोबत जोडले जाते. सोशल मीडियावर याबाबत तुफान चर्चा असतात. सारा तेंडुलकरसोबतच्या ब्रेकअपच्या अफवांदरम्यान, शुभमन गिलचे नाव बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबतही जोडले गेले. दोघे डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. इतकचं नाही तर दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं. पण मधल्या काळात शुभमनचे नाव सारा तेंडुलकर बरोबर जोडले जाऊ लागले. (sara ali khan and shubhman gill)

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news