Sanju Samson : धोनी जे करायचा तेच संजू सॅमसनने केले, अन् चाहत्यांची जिंकली मनं (Video)

Sanju Samson : धोनी जे करायचा तेच संजू सॅमसनने केले, अन् चाहत्यांची जिंकली मनं (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sanju Samson Does a MS Dhoni by Win With a Six : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनने चमकदार कामगिरी केली. त्याने विकेटच्या मागे 3 झेल आणि फलंदाजी करताना 43 धावा केल्या. त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. याशिवाय मॅचदरम्यान सॅमसनने असे काही केले, जे पाहून चाहत्यांना धोनीची आठवण झाली. खरे तर सॅमसननेही या सामन्यात षटकार मारून सामना संपवला आणि टीम इंडियाच्या विकयावर शिक्कामोर्तब केला. धोनी आपल्या विशिष्ट शैलीसाठी ओळखला जातो तशाच शैलीत षटकार मारून सॅमसनने सामना संपवला. संजूच्या या खास षटकाराचा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सनेही त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

सॅमसन हा भारतीय क्रिकेटचा असा क्रिकेटर आहे ज्याचा मोठ्या टूर्नामेंटमध्ये भारतीय संघात समावेश केला जात नाही. या खेळाडूचा झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत समावेश करण्यात आला असला तरी तो आशिया कपमध्ये टीम इंडियाचा भाग असणार नाहीय. निवड समितीचा नावडता असूनही सॅमसन (Sanju Samson) मैदानावर आपले शंभर टक्के देतो. याचे ताजे उदाहरण त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दिले. एकीकडे भारताच्या क्षेत्ररक्षणादरम्यान त्याने 3 झेल घेतले आणि फलंदाजी करताना नाबाद 43 धावांची खेळी खेळली. सॅमसनने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकार मारले.

एवढेच नाही तर भारतीय डावाच्या 26 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर सॅमसनने (Sanju Samson) लॉग-ऑनवर षटकार ठोकून भारताला पाच विकेटने विजय मिळवून दिला. खरं तर भारताला विजयासाठी फक्त एक धाव हवी होती आणि सॅमसन स्ट्राइकवर होता. तेव्हा चाहत्यांनी जल्लोष करत सॅमसनला षटकार मारण्याचे आवाहन केले. अशा स्थितीत सॅमसननेही चाहत्यांच्या मागणीचा मान राखत माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या शैलीत षटकार खेचून सामना संपवला. याचबरोबर त्याने चाहत्यांची मने आणि हृदये जिंकली. सॅमसनने षटकार मारून सामना संपवल्याचा व्हिडिओ शेअर करताना राजस्थान रॉयल्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'प्रेक्षक त्याच्याकडून मागणी करत होते आणि चेट्टाने निराश केले नाही.'

सॅमसनने (Sanju Samson) आपल्या खेळीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिला सामनावीराचा पुरस्कार पटकावला. 2015 मध्ये भारतीय संघातून पदार्पण करणाऱ्या सॅमसनला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही, त्यामुळे त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत. सॅमसनने आतापर्यंत 16 टी-20 आणि 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत. सॅमसनचे वनडे पदार्पण 2021 मध्ये झाले.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर सॅमसन म्हणाला, 'तुम्ही जितका जास्त वेळ मैदानावर घालवाल तितके तुम्हाला बरे वाटते. देशासाठी असे करणे अधिक विशेष आहे. मी तीन झेल घेतले, पण माझे स्टंपिंग चुकले. खरंच कीपिंग आणि बॅटिंगचा आनंद घेत आहे. मला वाटते भारतीय गोलंदाज खरोखरच चांगली गोलंदाजी करत होते, बरेच चेंडू माझ्याकडे आले.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news