Sanjay Raut : १०३ दिवस तुरूंगात होतो, आता तेवढेच आमदार निवडून आणणार – संजय राऊत

Sanjay Raut : १०३ दिवस तुरूंगात होतो, आता तेवढेच आमदार निवडून आणणार – संजय राऊत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : '१०३ दिवस तुरुंगात होतो, आता १०३ आमदार निवडून आणणार', असे शिवसेना नेते (ठाकरे गट) संजय राऊत म्हणाले आहेत. बुधवारी (दि.९) पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या पीएमपीएल कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर संजय राऊत हे त्यांच्या भांडुपमधील निवासस्थानी पोहचले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.(Sanjay Raut In Bhandup)

संजय राऊत म्हणाले, १०० दिवसांनी मी इथे आलोय. आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असतो. मी जाताना सांगितले होते की, मरण पत्करेल पण शरण जाणार नाही. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शिवसेना उद्धवस्त करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ही शिवसेना बुलंद आहे, मशाल आता भडकलेली आहे. यापुढे एकच शिवसेना महाराष्ट्रात राहिल. (Sanjay Raut In Bhandup)

मला अटक केली ही देशाच्या राजकारणातील सर्वांत मोठी चूक ठरेल : संजय राऊत

मला अटक केली ही देशाच्या राजकारणातील सर्वांत मोठी चूक ठरेल. न्यायालयाने सांगितले संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर आहे. आता तुम्हाला कळेल मला अटक करून तुम्ही किती मोठी चूक केली. या महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्रातले बोके खोक्यांवर बसलेले आहेत. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. (Sanjay Raut In Bhandup)

तुम्ही १०० दिवसानंतरही माझं स्मरण ठेवलतं. आज रस्त्यातून येताना प्रत्येक ठिकाणी लोक अभिवादन करत होते. हे लोक मला नाही तर शिवसेनेला अभिवादन करत होते. यामध्ये अनेक मुस्लीम लोकही होते, असे राऊत म्हणाले. मला परत अटक करण्याचा प्रयत्न होईल. ज्यांनी शिवसेना फोडली, शिवसेना नाव गोठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेचे तेच वैभव वापस येईल, असा दावाही संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut In Bhandup)

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news