धुळे, पुढारी वृत्तसेवा : केवळ शिव नाव लावून संकल्प यात्रा काढणारे हे दिल्लीचे गुलामी करीत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही दिल्लीची गुलामी केली नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. निवडणूक आयोगासह लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणणाऱ्या स्वायत्त संस्था आज पोखरल्या गेल्या आहेत. त्यांनी सत्तेत बसणाऱ्या चुकीच्या लोकांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवले पाहिजे, असे आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले. Sanjay Raut Vs CM Shinde
उत्तर महाराष्ट्रस्तरीय दौऱ्या अंतर्गत आज (दि.६) शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने खासदार संजय राऊत यांचा धुळे दौरा सुरू झाला. यात पत्रकारांसमवेत त्यांनी संवाद साधला. यावेळी शिवसेनेच्या नेत्या शुभांगी पाटील, संपर्क नेते अशोक धात्रक, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, तसेच सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसंकल्प यात्रेवर टीकास्त्र सोडले. केवळ यात्रेच्या नावापुढे शिव लावले म्हणून स्वाभिमान होत नाही, असा टोला त्यांनी लावला आहे. Sanjay Raut Vs CM Shinde
महाविकास आघाडीत वंचित आघाडीसह जागा वाटपात कोणताही मतभेद नाही. जवळजवळ चर्चा संपली असून येत्या काही दिवसांत कोठे कोठे कोणत्या पक्षाचे उमेदवार लढणार ते जाहीर केले जाणार आहे. महाविकास आघाडीतील पक्ष मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या वतीने पक्षाची भूमिका मांडली जाते. काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि शिवसेना हे मोठे पक्ष आहे. हे गट नाहीत. फुटलेल्या गटाला चाचपणी करावी लागते. मोठ्या पक्षाला चाचपणी करण्याची आवश्यकता भासत नाही. ते आपली भूमिका मांडतात. मिंधे गट व अजित पवार गट त्यांची उमेदवारी दिल्लीत ठरणार आहे. ही त्यांची अवस्था आहे. शिवसेनेने कधीही दिल्लीच्या आदेशाने चालली नाही. आज देशाचा स्वाभिमान म्हणून दिल्लीच्या गुलामीचे संकेत देत आहेत, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
देशात निवडणूक आयोगासह स्वायत्त संस्था देखील पोखरल्या गेल्या आहेत. चूक करणाऱ्या आजच्या सत्ताधाऱ्यांवर कारवाई करण्याची त्यांची हिंमत नाही. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे देशात राम मंदिरात उभारणे हे प्रत्येकाला भूषणावह आहे. म्हणून 22 जानेवारी रोजी नाशिक येथे क्रांतिकारक आंदोलन झालेल्या प्रभू रामचंद्रांच्या काळाराम मंदिरात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि पदाधिकारी हे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी गोदातीरी महाआरती केली जाईल. राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेक ज्ञात, अज्ञात कार्यकर्त्यांनी आपले बलिदान दिले आहे. त्यात शिवसेनेचे देखील योगदान आहे. अशा कार्यकर्त्यांच्या बलिदानाशिवाय राम मंदिराची एकही वीट ठेवणे शक्य झाले नसते. त्यामुळे या बलिदानाचे स्मरण देखील नाशिक येथे केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या पक्षाने जिंकलेल्या जागा व्यतिरिक्त चर्चा होणार आहे .शिवसेनेने 2019 मध्ये 18 जागा जिंकल्या होत्या. या जागा कायम राहतील असे त्यांनी सांगितले. धुळे लोकसभेची जागा ही काँग्रेसची परंपरागत जागा आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेना दावा सांगणार नाही. या मतदार संघात काँग्रेसची शक्ती असून येथील काँग्रेसच्या उमेदवाराने शेवटच्या आठ दिवसांत नांगी टाकून नये ,असा उपरोधिक सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा