Lok Sabha Election 2024 : आताचे महाराज कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत : संजय मंडलिक

Lok Sabha Election 2024 : आताचे महाराज कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत : संजय मंडलिक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election 2024 : आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान खासदार संजय मंडलिक यांनी केले आहे. ते सुद्धा दत्तक आले आहेत, त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचे संजय मंडलिक म्हणाले. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

संजय मंडलिक पुढे म्हणाले की, माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपले. मल्लाला हात लावायचा नाही, मल्लाला टांगच मारायचा नाही, मग ती कुस्ती कशी होणार? असाही सवाल संजय मंडलिक यांनी यावेळी केला.

कोल्हापूर लोकसभेला महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र त्यांच्याविरूद्द महायुतीकडून कोण? याबाबत संभ्रमावस्था होती. अखेर शिवसेनेकडून विद्यमान खा. संजय मंडलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली असल्याने शाहू महाराज आणि खा. मंडलिक यांच्यातच मैदान होणार असल्याने साहजिकच हाय होल्टेज लढत होईल.

छत्रपतींच्या गादीच्या अपमान : आमदार सतेज पाटील

छत्रपतींच्या गादीच्या अपमानाच काम संजय मंडलिक यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा प्रथम निषेध करतो. अशा पद्धतीच हे अपमानास्पद वक्तव्य कोल्हापूरची जनता कधीही सहन करणार नाही. या निवडणुकीची सुरूवात झाली त्यावेळी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराजांबद्दल कोणीही वैयक्तिक टीका करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. अशा सुचना देऊनही संजय मंडलिक आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी शाहू महारांजांविरुद्ध विधान करत आहेत. खरेतर त्यांना मतदानापूर्वीच आपला पराभव दिसत आहे. त्यातूनच ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news