Sangli MD drugs Seized : सांगलीत मोठी कारवाई : इरळी येथून २४५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; ६ जणांना अटक

इरळी येथे  धाड टाकून २४५ कोटींचे १२२.५ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले.
इरळी येथे धाड टाकून २४५ कोटींचे १२२.५ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले.

सांगली : पुढारी वृत्तसेवा: कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे धाड टाकून २४५ कोटींचे १२२.५ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने ६ संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयित हा कवठेमंकाळ तालुक्यातील असून तो मागील १७ वर्षापासून मुंबईमध्ये वास्तव्यास आहे. मुख्य संशयित एमडी ड्रग्ज ची तस्करी करत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई आज (दि.२५) करण्यात आली. Sangli MD drugs Seized

एमडी ड्रग्ज साखळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून सहा जणांना अटक केली आहे. संशयितांनी सांगलीमधील इरळी या गावामध्ये अत्यंत निर्मनुष्य ठिकाणी असणाऱ्या एका खोलीमध्ये एमडी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना थाटला होता. Sangli MD drugs Seized

सांगली जिल्ह्यामध्ये एमडी ड्रग्जची ही सर्वात मोठी दुसरी कारवाई आहे. यापूर्वी कुपवाडमध्ये तीनशे कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. आता पुन्हा इरळी गावामध्ये मोठी कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news