सांगली : पुढारी वृत्तसेवा सांगली लोकसभेसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. परंतु सात ते नऊ या दरम्यान सांगली लोकसभेसाठी केवळ 5.81 टक्के इतकच मतदान झाले आहे. ही मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये केवळ 65 टक्के इतकंच मतदान झालं होतं. यावेळी किती टक्के मतदान होणार हे पहावं लागणार आहे. परंतु केवळ दोन तासांमध्ये 5.81 टक्के इतकेच मतदान आतापर्यंत झाले आहे.
सांगली लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरस आहे. उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. त्यात विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरल्याने सांगली लोकसभेच्या जागेमध्ये चुरस निर्माण झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या सांगलीच्या लोकसभेच्या निवडणुकीकडे लागले आहे.
दरम्यान आज सकाळी विशाल पाटील यांनी पद्माळे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजित कदम, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम आणि सौ स्वप्नाली कदम व युवा नेते डॉ जितेश कदम यांनी आपल्या मतदानाचा हक्क सोनसळ तालुका कडेगांव येथे बजावला.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढू लागला आहे. त्यामुळे ऊन वाढण्यापूर्वी सकाळी लवकर मतदान करून जाण्यासाठी केंद्रांवर मतदारांची गर्दी होत आहे. आज सकाळी ७ वाजण्यापुर्वीच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.
हेही वाचा :