Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावरील दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश, फडणवीस यांची माहिती

Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावरील दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश, फडणवीस यांची माहिती

ठाणे, पुढारी ऑनलाईन : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Express Highway) शहापूर (जि. ठाणे) तालुक्यातील सरळांबे येथे पुलाचे काम सुरू असतानाच अचानक त्यावरील ग्रेडर आणि मशिन खाली कोसळून मोठी दुर्घटना घडली. सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. घटनास्थळी एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. (Samruddhi Mahamarg Accident)

"शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत ३ कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रूग्ण्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत." असे फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे.

शहापूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राहुल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर झालेल्या दुर्घटनेत मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पावसाने उघडीप दिल्याने या पुलाचे काम रात्री देखील सुरू होते. साडेबाराच्या सुमारास अचानक गर्डर खाली आला आणि त्याखाली कामगार सापडले. (Samruddhi Mahamarg Accident)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही, शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना घडलेल्या दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे ट्विट करत म्हटले आहे.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news