‘सॅम बहादूर’ची टक्कर ‘अ‍ॅनिमल’शी!

sam bahadur
sam bahadur

अभिनेता विकी कौशल याच्या आगामी 'सॅम बहादूर' या सिनेमाचा ट्रेलर रीलिज झाला आहे. 'फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ' यांच्या जीवनावर हा सिनेमाचे कथानक आहे. या सिनेमात विकीशिवाय अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलाकार ट्रेलरमध्ये दिसले. मेघना गुलजार दिग्दर्शित हा सिनेमा 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर रणबीर कपूर याच्या 'अ‍ॅनिमल' या सिनेमाशी असणार आहे.

'सॅम बहादूर' या सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात गुरुवाणीच्या ओळींनी होते आणि माणेकशॉ सैनिकांना प्रोत्साहित करतात. त्यानंतर सॅम माणेकशॉ यांनी भारतीय सैन्याचे नेतृत्व कसे केले आणि 1971 च्या भारत-पाक युद्धात भारताला कशी मदत केली, हे दाखवले आहे. विकीशिवाय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत फातिमा सना शेख आणि सॅम यांच्या पत्नीच्या भूमिकेत सान्या मल्होत्रा आहे. माणेकशॉ यांनी 40 वर्षे देश सेवा केली होती आणि त्यांची शैली विक्कीने सिनेमात साकारली आहे. आता सिनेमाची चाहते आतुरतेने वाटत पाहत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news