पुढारी ऑनलाईन डेस्क : मेगास्टार सलमान खान आणि कॅटरिना कैफ आदित्य चोप्राच्या टायगर ३ मधून पुन्हा भेटीला आले आहेत. (Tiger 3) सुपर-एजंट टायगर आणि झोया वायआरएफ स्पाय युनिव्हर्ससोबत काम करताहेत. आज लेके प्रभु का नाम हा पार्टी ट्रॅक रिलीज करण्यात आला आहे. (Tiger 3)
प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेल्या या विबे डान्स ट्रॅकमध्ये सलमान आणि कॅटरिना यांनी अप्रतिम केमिस्ट्री दाखवली. ते अतिशय सुंदर दिसत आहेत, तर अमिताभ भट्टाचार्य यांनी गीते लिहिली आहेत. लेके प्रभु का नाम (हिंदी वर्जन) अरिजित सिंग आणि निखिता गांधी यांनी गायले आहे! तामिळ आणि तेलुगू वर्जन बेनी दयाल आणि अनुषा मणी यांनी गायली आहे.
लेके प्रभू का नाम या चित्रपटाचे चित्रीकरण अतिशय भव्य दिव्य करण्यात आले आहे. टीमने टर्कीमधील कॅपाडोशिया येथील विलक्षण ठिकाणी प्रवास केला! कोरिओग्राफर वैभवी मर्चंट स्वॅग हिने 'स्वॅग स्वागत' कोरिओग्राफ केला होता.
सलमान खान आणि कॅटरिना कैफ या गाण्यात एजंट झोया आणि टायगरच्या भूमिकेत आहेत. कॅटरिनाने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे. Music vusic start karo #LekePrabhuKaNaam #Tiger3 हा १२ नोव्हेंबरला सिनेमागृहात दाखल. हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होत आहे.
"लेके प्रभु का नाम' हे गाणे मनीष शर्मा दिग्दर्शित टायगर 3 मधील पहिले गाणे आहे. उल्लेखनीय म्हणजे, चित्रपटात इमरान हाश्मीची भूमिका आहे. टायगर ३ हा रविवार, १२ नोव्हेंबर रोजी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.