Salman Khan Threat: पुढच्या वेळेस मोठा झटका…सलमानला धमकीचा मेल

salman khan
salman khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खानला पुन्हा धमकी मिळाली आहे. ही धमकी ईमेलच्या माध्यमातून मिळाली असून याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आणि एफआयआर दाखल केली आहे. (Salman Khan Threat) या ई मेलमध्ये गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिश्नोईचं नावदेखील आहे. हा ईमेल १८ मार्च, २०२३ रोजी दुपारी पावणे २ वाजण्याच्या सुमारास आला आहे. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या मेलवर हा ईमेल पाठवण्यात आलाय. (Salman Khan Threat)

या मेलवर गोल्डी बराडचा उल्लेख आहे. सलमानला धमकी देण्यात आली की, गोल्डी बराड़शी बातचीत करावी, अथवा पुढच्या वेळी धक्का बसेल. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केले आहे. पोलिसांनी सलमान खानच्या मॅनेजरच्या तक्रारीवर गोल्डी बरार आणि लॉरेन्सविरोधात तक्रार दाखल केलीय.

या ईमेलमध्ये म्हटलं आहे की- "गोल्डी भाई (गोल्डी बराड) ला बोलायचं आहे, तुझा बॉस सलमानशी." पोलिसांनी वाढवली सुरक्षा व्यवस्था ईमेल मिळाल्यानंतर पोलिसांनी सलमानची सुरक्षा वाढवली आहे. गॅलेक्सी बाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवलीय.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news