Salman Khan Firing : गोळीबारातील बंदूक शोधण्यासाठी क्राईम ब्रँचची टीम पोहोचली सुरतमध्ये

Salman Khan
Salman Khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर १४ एप्रिल रोजी गोळीबाराची घटना घडली होती. बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan Firing) निवासस्थानावर गोळीबार करताना आरोपीने वापरलेली बंदूक शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे एक पथक आता सुरतला पोहोचले. चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्यानंतर त्यांनी बंदूक तापी नदीत फेकल्याचे गुन्हे शाखेला सांगितले. (Salman Khan Firing)

गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांनी दोन आरोपी विक्की गुप्ता (वय २४) आणि सागर पाल (वय २१) यांना गुजरातमधील कच्छ येथून अटक केली होती.

रिपोर्टनुसार, याआधी गोळीबारात वापरण्यात आलेली मोटारसायकलीच्या मालकाची चौकशीदेखील केली आहे. मोटारसायकल नवी मुंबईच्या पनवेल परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या नावे रजिस्टर होती.

सलमान खानच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर तो 'सिकंदर' मध्ये दिसेल. या चित्रपटाच्या टायटलची घोषणा सलमान खानने ईद निमित्त केली होती. पुढील वर्षी हा चित्रपट रिलीज होईल. चित्रपटाचे दिग्दर्शन ए आर मुरुगदास करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news