पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड कप २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याआधी सलमान खानने टायगर ३चे विशेष प्रमोशन केले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना सुरु आहे. या सामन्याच्या आधी तो स्टुडिओमध्ये गेला. स्टुडिओतून त्याने फॅन्ससाठी संदेश दिला. यावेळी त्याने त्याचा आगामी चित्रपट टायगर-३ चे प्रमोशनदेखील केले.
संबंधित बातम्या –
दरम्यान, रोहित शर्माने हे देखील कन्फर्म केलं होतं की, शुभमन गिल पूर्णपणे फिट आहे. त्यामुळे वर्ल्ड कप सामन्यात शुभमनने एन्ट्री घेतली. दोन्ही टीमच्या महामुकाबला आधी सलमान स्टुडिओमध्ये दिसला.
'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या २५ वर्षांनंतर सलमान खान आणि करण जोहर एकत्र येत आहेत. दिग्दर्शक विष्णुवर्धन यांच्या आगामी चित्रपटासाठी ते एकत्र काम करतील. बिग बजेट ॲक्शन थ्रिलरच्या कास्टिंगसाठी मोठी चर्चा होत आहे. यावेळी वास्तवात सलमान खान बाल्ड लूकमध्ये दिसला. असे म्हटले जात आहे की, सलमानची ही हेअरस्टाईल विष्णुवर्धन यांच्या पुढील चित्रपटासाठी आहे.