Salman-Emraan : आनंदाची बातमी! Tiger-3 चा ट्रेलर पाहिला का?

tiger 3
tiger 3

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवुड सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा ॲक्शन आणि सस्पेंस-थ्रिलरने भरपूर टायगर ३ घेऊन येतोय. (Salman-Emraan) या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलीय. टायगर ३ चा ट्रेलर (Tiger-3) सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये सलमानसोबत कॅटरीनाची दमदार ॲक्शन मिळत आहे. विशेष म्हणजे, टायगर ३ चा (Tiger-3) विलेन इमरान हाशमीची एन्ट्रीही आहे. (Salman-Emraan)

संबंधित बातम्या –

टायगर ३ च्या ट्रेलरवरून सलमान खानच्या चित्रपटाची कथा समजतते. यावेळी अविनाश सिंगचे मिशन रॉ नसून वैयक्तिक असणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला एक महिला बोलताना दिसत आहे. ती म्हणते की, देशाची शांतता आणि त्याच्या शत्रूंमध्ये फक्त एका पुरुषाचे अंतर आहे. मग सलमान भिंत तोडून आत प्रवेश करतो आणि बाईक चालवतो आणि अनेक छतांवर उडी मारतो. बर्‍याच अॅक्शननंतर सलमान खान कॅटरिना कैफसोबत रोमान्स करताना दिसत आहे.

आता बॅकग्राऊंडमध्ये आवाज ऐकू येतो. इमरान हाश्मी म्हणतो – प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे कुटुंब. टायगर ३ ची कथा इथून सुरू होते.

इमरान हाशमीच्या एंट्रीने थरकाप उडतो. ट्रेलरवरून समजते की, इमरान हाश्मी त्याच्या कुटुंबाला हिसकावून घेण्याचा बदला घेण्यासाठी आला आहे. आता खरी कहाणी काय असेल? हे १२ नोव्हेंबर, २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये समजणार आहे. रिपोर्टनुसार, अॅक्शन सीनमध्ये शाहरुख खानचा कॅमिओ दिसणार आहे. जे या चित्रपटाचे मुख्य आकर्षण असेल.

सोमवार, १३ नोव्हेंबरला अमावस्या आहे आणि गोवर्धन पूजा/गुजराती नववर्ष १४ नोव्हेंबरला आहे. भाऊबीज १५ नोव्हेंबरला आहे, ज्यामुळे या महत्त्वपूर्ण सुट्टीच्या काळात चित्रपटाला अधिक स्पेस मिळेल, ज्यामुळे चित्रपटाला वीकली कलेक्शन करण्यात मदत होईल. मनीष शर्मा दिग्दर्शित, टायगर ३ मध्ये सलमान खान, कॅटरिना कैफ आणि इमरान हाशमी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत जगभरात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news