Salaman Khan : हाय सिक्युरिटीसह सलमान खान दुबईला रवाना (Video)

salman khan
salman khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारानंतर अभिनेता दुबईला जाण्यासाठी रवाना झाला. यावेळी विमानतळावर हाय सिक्युरिटीमध्ये तो गाडीतून उतरत विमानतळाकडे जाताना दिसला. यावेळचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Salaman Khan) फॅशनेबल फाटलेल्या जीन्समध्ये तो स्टायलिश दिसला. नेहमीप्रमाणे डोळ्यांवर गॉगल आणि सोबत सिक्युरिटी असा क्षण कॅमेराबद्ध झाला. (Salaman Khan)

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर सलमान खान चिंतेत असल्याचे म्हटले जाते. १९ एप्रिलला तो मुंबई विमानतळावर दिसला. रिप्ड जीन्स आणि टी-शर्टमध्ये त्याचा स्वॅग वेगळाच होता. तो एका प्रोजेक्टसाठी रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.

१४ एप्रिलच्या सकाळी सकाळी सलमान खानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला होता. रिपोर्टनुसार, गोळीबारानंतर मुंबई पोलिस आणि सरकारने सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचले.

video-FIGHTя x वरून साभार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news