Sai Tamhankar : सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला बेल्ट, काठीने मारहाण; पोलिसांत घेतली धाव

सई ताम्हणकर
सई ताम्हणकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरच्या गाडी ड्रायव्हरला चार तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीय. या प्रकारानंतर ड्रायव्हरने पोलिसांत धाव घेतल्याचे समजते. संपूर्ण प्रकरण काय आहे, जाणून घेऊया. (Sai Tamhankar ) सईचा ड्रायव्हर ३२ वर्षाचा आहे. मालवणी परिसरात जाताना चार तरुण बेदकार गाडी चालवत होते. त्यामुळे ड्रायव्हरने दोनदा हॉर्न वालवल्याने तरुणांनी मारहाण करायला सुरुवात केली. (Sai Tamhankar )

ड्रायव्हरचे नाव सद्दाम मंडल असे आहे. तो गेल्या ६ वर्षांपासून अभिनेत्रीकडे काम करतो. हे तरुण झिगझॅग पद्धतीने दुचाकी चालवत होते. त्यावेळी सातत्याने हॉर्न वाजवला म्हणून त्यांनी ड्रायव्हरला बेल्ट आणि बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. यानंतर ड्रायव्हर पोलिसांत पोहोचला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी चार तरुणांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. दरम्यान, जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news