प्रेमाची गोष्ट : सागर-मुक्ताचा रंगणार संगीत सोहळा

प्रेमाची गोष्ट
प्रेमाची गोष्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत सध्या मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. सईवरच्या प्रेमाखातर सागर-मुक्ताने लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. साखरपुडा आणि मेहंदी समारंभ थाटात पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती संगीत सोहळ्याची.

संबंधित बातम्या 

या संगीत सोहळ्यात 'मन धागा धागा जोडते नवा', 'लग्नाची बेडी', 'अबोली' आणि 'पिंकीचा विजय असो' मालिकेतील कलाकार खास हजेरी लावणार आहेत. स्टार प्रवाह परिवारासोबतच मुक्ता आणि सागरचा खास परफॉर्मन्स देखील पाहायला मिळणार आहे. चिमुकली सईही 'मी हाय कोळी' गाण्यावर ठेका धरणार आहे. यामुळे लग्नाचा संगीत सोहळा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news