पुढारी ऑनलाईन डेस्क : अध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासुदेवसाठी सगळीकडून ते लवकर बरे व्हावेत यासाठी संदेश येऊ लागले. त्यांची रविवारी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात आपातकालीन ब्रेन सर्जरी झाली. (Sadhguru Jaggi Vasudev ) दिल्लीचे इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाचे एका वरिष्ठ डॉक्टरांनी बुधवारी सांगितलं की, त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला होता. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. (Sadhguru Jaggi Vasudev )
सद्गुरुंची मुलगी, राधे जग्गीने देखील आपल्या वडिलांच्य़ा स्वास्थ्यावर अपडेट शेअर केला आहे. राधे जग्गीने बुधवारी इन्स्टाग्राम स्टोरीजवर लिहिलं, "विचारण्यांसाठी, सद्गुरु चांगले आहेत आणि लवकरचं ठिक होणार आहेत." सद्गुरु जग्गी वासुदेव, जे कोईमतूर मुख्यालय ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत.
या व्हिडिओमध्ये जग्गी वासुदेव म्हणाले, "अपोलो रुग्णालयाच्या न्युरोसर्जनने माझे डोके उघडून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना काही मिळाले नाही. डोके पूर्णपणे मोकळे मिळाले. पमग त्यांनी पुन्हा शिवून टाकलं. आता मी ठिक आहे."