SA vs IND Test : पत्रकार परिषदेला द्रविड हजर, कोहली गैरहजर

SA vs IND Test : पत्रकार परिषदेला द्रविड हजर, कोहली गैरहजर
Published on
Updated on

जोहान्सबर्ग ; वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका (SA vs IND Test) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्गमधील वाँडरर्स स्टेडियमवर उद्यापासून (सोमवार) सुरू होणार आहे. या सामन्यात विराट कोहली कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र, सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेला कोहलीच आला नाही. त्याच्या स्थानी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पत्रकार परिषदेत सहभागी झाले.

यावेळी द्रविड यांना पत्रकार परिषदेतील कोहलीच्या गैरहजेरीबद्दल विचारण्यात आले. यावेळी द्रविड म्हणाले की, 'विराट आपल्या 100 व्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येवर मीडियाशी बोलणार आहे.'

राहुल द्रविड यांनी यावेळी विराटचे कौतुकही केले. ते म्हणाले, 'गेल्या 20 दिवसांत इतके काही घडले असले तरी विराट असाधारणच राहिला. त्याने या काळात ज्याप्रमाणे सराव केला. संघासोबत राहिला हे खरोखरच कौतुकास्पद आहे.'

'कर्णधार विराटचे हे 'फेव्हरिट' मैदान आहे आणि दुसर्‍या कसोटीत त्याला अनेक विक्रम (SA vs IND Test) मोडण्याची संधी आहे. शिवाय 71 व्या आंतरराष्ट्रीय शतकाचा दुष्काळही तो इथेच संपवेल,' असा विश्‍वास द्रविड यांनी व्यक्‍त केला आहे. 'विराटसारख्या खेळाडूसोबत काम करणे म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. माझ्या नजरेतून पहाल तर विराट आता चांगल्या टचमध्ये आहे.

ज्याप्रकारे तो सराव सत्रमात खेळतोय, ते पाहून लवकरच त्याच्याकडून मोठी खेळी होईल, असे मला वाटते. संघाचे मनोबल उंचावण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करतो आणि स्वतःचा आत्मविश्‍वासही उंचावतोय. भारतीय संघाने जी उंची गाठलीय, त्यात विराटचे खूप मोठे योगदान आहे.'

विराट पत्रकार परिषदेसाठी केव्हा येईल, यावर द्रविड म्हणाला, 'केपटाऊन येथे विराट 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. जर तेव्हा त्याने पत्रकार परिषदेत हजेरी लावली तर तो मोठा इव्हेंट होईल. तेव्हा पत्रकार त्याला 100 व्या कसोटीबाबत प्रश्‍न विचारू शकतील. त्याच्यासोबत हा क्षण सेलिब्रेटही करू शकतील; पण माझ्या माहितीत तो आजच्या पत्रकार परिषदेत नसण्यामागे काहीच कारण नाही.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news