पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचे प्रसिध्द दिग्दर्शक एस. एस. राजामौली की फिल्म 'आरआरआर' (RRR Movie) पडद्यावर रिलीज होण्यास सज्ज आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते प्रमोशन करत आहेत. आता या चित्रपटाची टीम प्रचारासाठी जयपूर हवा महल येथे पोहोचले आहेत. याआधी आरआरआरच्या टीमने गुजरातच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' (RRR Movie) चा दौरा केला. तेथील फोटोदेखील व्हायरल झाले. आता या चित्रपटाविषयी एक वृत्त समोर येत आहे. राम चरण, ज्यु. एनटीआर, अजय देवगन आणि आलिया भट्टचा चित्रपट 'आरआरआर' जगभरात २डी आणि ३डी मध्ये रिलीज होणार आहे.
राजमौली आणि 'आरआरआर' टीमने एक नवं पोस्टर जारी केलं आहे. यामध्ये सिनेप्रेमींना ३ डीमध्ये चित्रपटाचा अनुभव घेता येईल. विशेष म्हणजे एस. एस. राजमौलीचा आरआरआर डॉल्बी सिनेमामध्ये रिलीज होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. चित्रपट 'आरआरआर'मध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआर, आलिया भट्टसोबत अजय देवगनदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २५ मार्च रोजी रिलीज होईल. फॅन्सना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान, रामचरण, आलिया भट्ट आरआरआर या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी दिल्लीमध्ये पोहोचली. यावेळी 'आरआरआर' च्या टीमसोबत मूव्ही प्रमोशनसाठी बॉलीवूड अभिनेते आमिर खानदेखील पोहोचले. या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाले होते. परंतु, प्रमोशनवेळी आलिया भट्टचा वागणं बघून तिला ट्रोल केले जात आहे.
साऊथ आणि बॉलिवूडच्या कलाकारांशिवाय या चित्रपटात हॉलीवूड अभिनेते रे स्टीवेन्सन, ओलिविया मॉरेस आणि एलिसन डूडी यांच्यादेखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.
चित्रपट आरआरआरमध्ये अनेक मोठे स्टार आहे तसेच याचे बजेटदेखील मोठे आहे. रिपोर्ट्सनुसार, 'आरआरआर' हा सर्वात महाग चित्रपटांमध्ये समाविष्ट आहे. या चित्रपटाचे जवळपास ३३६ कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. तसेच असं म्हटलं जात आहे की, यामध्ये स्टारकास्टचे मानधन समाविष्ट नाही.