पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन G-20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत, असे रशियाने स्पष्ट केले आहे. आता त्यांच्या ऐवजी रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव पुढील आठवड्यात भारतात होणाऱ्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार असल्यावे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
भारतात G20 परिषद ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणार आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंत्री लावरोव्ह दोन पूर्ण सत्रांना उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. ते परिषदेत अनेक द्विपक्षीय चर्चा आणि बैठकात सहभागी होतील. आम्ही भारताच्या G20 अध्यक्षपदाचे एकत्रित स्वरूप, विकसनशील देशांच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी एक विधायक वातावरण निर्माण करण्याची देशाची वचनबद्धता लक्षात घेतो. या परिषदेत आफ्रिकन युनियनला कायमस्वरूपी स्वीकारण्याबाबत निर्णय घेण्याची अपेक्षा आहे."