Russian woman : तुम्ही राक्षस जन्माला घातला! ‘त्या’ रशियन महिलेला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Russian woman : तुम्ही राक्षस जन्माला घातला! ‘त्या’ रशियन महिलेला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

मॉस्को; वृत्तसंस्था : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या आई-वडिलांच्या कबरींची विटंबना केल्याबद्दल सेंट पीटर्सबर्ग येथील एका महिलेला (वय 60) न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ऑक्टोबरमध्ये या महिलेस दोषी ठरवण्यात आले होते. (Russian woman)

इरिना सिबानेवा नावाच्या या महिलेने पुतीन यांच्या आई-वडिलांच्या कबरीजवळ एक चिठ्ठी टाकली होती. तुम्ही एका राक्षसाला जन्माला घातले आहे, असे इरिनाने या चिठ्ठीत लिहिले होते. पुतीन यांच्या आई-वडिलांचा अपमान केल्याबद्दल तिला दोषी ठरवण्यात आले. पुतीन यांचा मृत्यू व्हावा, ही संपूर्ण जगाची इच्छा असल्याचेही तिने लिहिले होते. (Russian woman)

शिक्षिकेलाही शिक्षा

निकिता तुष्कानोव्ह या इतिहासाच्या शिक्षिकेला न्यायालयाने साडेपाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. क्रिमियातील केर्च ब्रिजवर गतवर्षी युक्रेनने केलेल्या हल्ल्याचे निकिता यांनी समर्थन केले होते. त्याबद्दल निकितावर गुन्हा नोंदविण्यात आला होता.तुम्ही राक्षस जन्माला घातला!

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news