Putin Assassination Attempt : पुतीन यांच्या गाडीत स्फोट, प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावले

Putin Assassination Attempt : पुतीन यांच्या गाडीत स्फोट, प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावले
Published on
Updated on

मॉस्को : पुढारी ऑनलाईन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न फसला आहे. जनरल जीव्हीआरच्या टेलिग्राम वाहिनीवर युरो वीकली न्यूजच्या हवाल्याने बुधवारी ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली. पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न कधी झाला हे कळू शकलेले नाही. रशियाने या महिन्यात युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यापासून व्लादिमीर पुतिन यांच्या आरोग्याबद्दल आणि त्यांच्या आयुष्याविषयी अनेक अफवा पसरल्या जात आहेत. यापूर्वी सुद्धा पुतीन यांना जिवे मारण्याचे पाच वेळा प्रयत्न झाले आहेत, याबाबत 2017 मध्ये जाहीर करून याची माहिती देण्यात आली होती.

दरम्यान, मिरर या ब्रिटीश दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांच्या लिमोझिन कारच्या पुढच्या बाजूला मोठा आवाज झाला. त्यानंतर आजूबाजूला धुराचे लोट पसरले. ही घटना या आठवड्यात घडली. मात्र, या हल्ल्यात 69 वर्षीय पुतिन यांना कोणतीही इजा झाली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून हत्या करण्याच्या प्रयत्नात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अनेकांना अटक केली आहे, असे म्हटले आहे.

पुतीन तीन नंबरच्या कारमध्ये होते…

सुरक्षेच्या भीतीने पुतीन या आठवड्यातील एके दिवशी (वार तारीख समजलेले नाही) त्यांच्या अधिकृत निवासस्थानी परतत होते. यावेळी त्यांच्या सुरक्षा ताफ्यात पाच बख्तरबंद गाड्या एकत्र होत्या. पुतिन तीन नंबरच्या गाडीत बसले होते. दरम्यान, निवासस्थानाच्या वाटेवर असताना काही किलोमीटर अंतरावरच पहिली एस्कॉर्ट कार रुग्णवाहिकेने अडवली आणि दुसरी एस्कॉर्ट कार न थांबता अचानक वेगाने निघून गेली. त्यानंतर पुतिन यांच्या कारमध्ये डाव्या पुढच्या चाकातून मोठा आवाज झाला आणि त्यानंतर धुराचे लोट आले. तथापि, हल्ला झाल्याचे समजताच सुरक्षा रक्षकांनी पुतीन यांना गाडीतून बाहेर काढले आणि त्यांच्या निवासस्थानी सुखरूप पोहचवले, असे क्रेमलिन विरोधी वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

एका आठवड्यापूर्वी, सेंट पीटर्सबर्गमधील काही राजकारण्यांनी रशियन संसदेला पुतीन यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्याचे आणि पुतीन यांचे अधिकार काढून घेण्याचे आवाहन केले. युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियन सैन्याला झालेले नुकसान आणि पाश्चात्य देशांनी लादलेले निर्बंध यामुळे रशियन अर्थव्यवस्थेची मोठी हानी झाली आहे, असे सांगत पुतीन यांचे विरोधक आक्रमक झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सेंट पीटर्सबर्ग, मॉस्को आणि इतर अनेक क्षेत्रांतील 65 प्रतिनिधींनी सोमवारी पुतीन यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर स्वाक्षरी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news