पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनमधील युद्धबंधकांना घेऊन जात असलेले रशियाचे लढाऊ विमानाला अपघात झाला आहे. हे विमान कोरोचानस्की जिल्ह्यात कोसळले. या विमानात ६५ युद्धकैदींसह ७४ जण ठार झाले आहेत, असे वृत्त 'एपी'ने दिले आहे. (Russian plane crashes)
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या IL – 76 या विमान ६५ युद्धकैदींसह ७४ जण हाेते. ६५ कैद्यांशिवाय विमानात सहा क्रु मेंबर आणि ३ सहायक हाेते. हे विमान बेलगोरॉड प्रांतात काेसळले. या अपघातात सर्वजण मृत्युमुखी पडलेल्याच्या वृत्ताला राज्यपाल व्याचेस्लाव ग्लाडकोव यांनी दुजोरा दिला आहे.
रशियातील खासदार आंद्रेयी का कार्टोपोलोव यांनी हे विमान युक्रेनने पाडल्याचा आरोप केला आहे. कार्टोपोलोव यांनी रशियाच्या संसदेत हा आरोप केला. पाश्चात्य देशांनी पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा वापर करून हे विमान पाडण्यात आले, असे ते म्हणाले.
हेही वाचा