Operation Ganga : ‘ऑपरेशन गंगा’मुळे वाचलेला केरळचा अभिजित स्वत:च्या अपत्यास देणार ‘गंगा’ नाव!

Operation Ganga : 'ऑपरेशन गंगा'मुळे वाचलेला केरळचा अभिजित स्वत:च्या अपत्यास देणार ‘गंगा’ नाव!
Operation Ganga : 'ऑपरेशन गंगा'मुळे वाचलेला केरळचा अभिजित स्वत:च्या अपत्यास देणार ‘गंगा’ नाव!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात भारत सरकार 'ऑपरेशन गंगा'द्वारे युक्रेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यात गुंतले आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये केरळमधील एक व्यक्ती आपल्या गर्भवती पत्नीसह अडकला होता. ऑपरेशन गंगा अंतर्गत, भारतीय दूतावासाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षित स्थळी नेले. यावर त्या व्यक्तीने आपल्या मुलांचे नाव ऑपरेशन गंगा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिजीत हा मूळचा केरळचा आहे. तो कीवमध्ये एक रेस्टॉरंट चालवत होता. तिथे तो पण रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती बिघडली. त्यातच अभिजित आणि त्याची नऊ महिन्यांची गर्भवती पत्नी कीवमध्ये अडकले. सुदैवाने पत्नीला पोलंडमधील रोजो येथील भारतीय दूतावासाने उभारलेल्या निवारा कक्षात सुरक्षित पाठवण्यात त्याला यश आले.

एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अभिजीतने हल्ल्यांदरम्यान सुरक्षित ठिकाणी राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केला. अभिजीतने सांगितले की, माझी पत्नी नऊ महिन्यांची गरोदर असून तिला पोलंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या अहवालानुसार पत्नी आणि मूल दोघेही निरोगी असून, २६ मार्च रोजी प्रसूती होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारताने सुरू केलेल्या 'ऑपरेशन गंगा' या बचाव मोहिमेवर माझ्या अपत्याचे नावे ठेवण्याचा निर्णय मी घेतला आहे.

अभिजीतने सांगितले की, 'मी कीवमध्ये एक छोटेखानी रेस्टॉरंट चालवत असे आणि युद्धादरम्यान आम्ही कीवमध्ये अडकलो. भारत सरकारच्या ऑपरेशन गंगामुळे मी माझ्या पत्नीसह पोलंडला सुरक्षितपणे येऊ शकलो. यासाठी मी भारत सरकारचे आभार मानतो. युक्रेनहून पोलंडला येण्यासाठी मला एक रुपयाही खर्च आला नाही. मी भारतात येत आहे. पण माझ्या पत्नीला वैद्यकीय सुरक्षा आणि उपचाराच्या कारणास्तव पोलंडमधील रुग्णालयात राहावे लागत आहे.'

युक्रेनमधून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सुरू केले आहे. भारतीय हवाई दल देखील या ऑपरेशनमध्ये १ मार्च रोजी कार्यरत झाले. भारतीयांच्या मदतीसाठी 'ऑपरेशन गंगा'चे ट्विटर हँडलही तयार करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news