IPL 2023 : हाय फ्लाईंग लखनौसमोर आज आरसीबीचे आव्हान

IPL 2023 : हाय फ्लाईंग लखनौसमोर आज आरसीबीचे आव्हान
Published on
Updated on

बंगळूर, वृत्तसंस्था : प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ (IPL 2023) आज दि. 10 हाय फ्लाईंग लखनौ सुपर जायंटस्विरुद्ध घरच्या मैदानात उतरेल, त्यावेळी फलंदाजांनी अधिक ताकद पणाला लावणे आणि गोलंदाजीत डेथ ओव्हर्समध्ये अधिक शिस्त राखणे आरसीबीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

आरसीबी संघाला यापूर्वी मागील लढतीत कोलकाता नाईट रायडर्सकडून 81 धावांनी नामुष्कीजनक पराभावाला सामोरे जावे लागले होते. आता येथे घरच्या मैदानावर, चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळत असताना विजयपथावर परतण्याचे त्यांचे मुख्य लक्ष्य असणार आहे. ही स्पर्धा अद्याप पहिल्या टप्प्यात आहे. मात्र, आरसीबीला डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीकडे वेळीच पुरेसे लक्ष देणे क्रमप्राप्त असणार आहे.

यापूर्वी केकेआरविरुद्ध लढतीत ते हंगामातील दुसरा विजय नोंदवण्याच्या मार्गावर होते. पण, 12 व्या षटकानंतर सामन्याचा सर्व नूर पालटून गेला. एकवेळ त्यांनी केकेआरला 5 बाद 89 धावा असे रोखून धरले होते. मात्र, नंतर केकेआरने अगदी 7 बाद 204 धावांचा डोंगर रचत आश्चर्याचा धक्का दिला होता. मुंबईविरुद्ध लढतीतही त्यांनी शेवटच्या पाच षटकांत प्रतिषटक 13 पेक्षा अधिक सरासरीने धावा बहाल केल्या. डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट हर्षल पटेल व मोहम्मद सिराज यांनी नव्या चेंडूवर उत्तम मारा केला असला तरी डेथ ओव्हर्समध्ये ते अजिबात प्रभावी ठरू शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आजच्या लढतीत आरसीबीच्या फलंदाजांना लखनौच्या फिरकीविरुद्ध अधिक दक्ष राहावे लागेल.

दुसरीकडे, लखनौने आतापर्यंत 2 विजय व 1 पराभव अशी कामगिरी नोंदवली असून फलंदाजी अधिक सातत्यपूर्ण होणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. काईल मेयर्सची कामगिरी उत्तम होत असली तरी कर्णधार के.एल. राहुल व अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस यांचा फॉर्म चिंतेचा ठरत चालला आहे.

संभाव्य संघ : (IPL 2023)

लखनौ सुपर जायंटस् : के.एल. राहुल (कर्णधार व यष्टिरक्षक), काईल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, निकोलस पूरन (यष्टिरक्षक), नुवान अल हक, आयुष बदोनी, आवेश खान, कर्ण शर्मा, युद्धवीर चरक, यश ठाकूर, रोमारिओ शेफर्ड, मार्क वूड, स्वप्निल सिंग, मनन वोहरा, डॅनिएल सॅम्स, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौतम, जयदेव उनाडकट, मार्कस स्टॉयनिस, रवी बिश्नोई, मयांक यादव.

आरसीबी : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन अ‍ॅलन, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, वेन पर्नेल, हिमांशू शर्मा, मनोज भंडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव, मायकल ब्रेसवेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news