IPL 2024 Auction : रॉवमन पॉवेलची 3 वर्षांची कमाई 2 महिन्यांत

IPL 2024 Auction : रॉवमन पॉवेलची 3 वर्षांची कमाई 2 महिन्यांत
Published on
Updated on

दुबई, वृत्तसंस्था : सर्वात पहिली बोली (IPL 2024 Auction) वेस्ट इंडिजच्या 20 वर्षीय रॉवमन पॉवेलवर लावण्यात आली. पॉवेलची बेस प्राईज 1 कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती; पण त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरस दिसली. अखेर राजस्थानने 7.40 कोटी रुपयांची बोली लावत पॉवेलला आपल्या संघात घेतले. त्याला विंडीज मंडळाकडून वर्षाला अडीच कोटी रुपये मिळतात. म्हणजेच त्याला 7.40 कोटी कमावण्यासाठी 3 वर्षे खेळले पाहिजे.

23 जुलै 1993 मध्ये जन्मलेला रॉवमन पॉवेल विंडीजचा खेळाडू आहे. विंडीजच्या संघाकडून टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळणारा पॉवेल पॉवर हिटर म्हणून ओळखला जातो. 2015 मध्ये पॉवेलने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली. त्यामुळे तो चर्चेत आला. आता 'आयपीएल'मध्ये त्याला बेस प्राईजपेक्षा साडेसातपट किंमत मिळाली आहे. (IPL 2024 Auction)

पॉवेलची एकूण संपत्ती 2 मिलियम डॉलरच्या घरात जाते. भारतीय चलनात ही रक्कम 16 कोटी रुपये इतकी आहे. वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी त्याला वर्षाकाठी 2,50,000 डॉलर म्हणजेच 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळते. याशिवाय ब्रँड अँडॉर्समेंटसह 'सीपीएल' आणि 'आयपीएल' करारातून बरीच रक्कम मिळते. याआधी 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने पॉवेलसाठी 2.8 कोटी रुपयांची बोली लावली होती.

जमैकाच्या किंग्स्टनमध्ये पॉवेलचे आलिशान घर आहे. त्याची किंमत कोटींच्या घरात जाते. याशिवाय पॉवेलला लक्झरी कार्सची आवड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये मर्सिडीजशिवाय अनेक एसयूव्ही कार आहेत. पॉवेल वेस्ट इंडिजसाठी 66 टी-20 सामने खेळला आहे. त्यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह त्याच्या नावावर 2,202 धावा आहेत. याशिवाय 51 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने विंडीजचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यात 1 शतक आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 979 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 3, तर टी-20 मध्ये 5 फलंदाज बाद केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news