पुढारी ऑनलाईन डेस्क
आंतरराष्ट्रीय फुटबॅालमधील अनेक विक्रम आपल्या नावावर कोरणाऱ्या क्रिस्तियानो रोनाल्डोने अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे. शुक्रवारी (दि.०३) झालेल्या सामन्यात रोनाल्डोने मैनचेस्टर युनायटेड कडून खेळताना आर्सेनलच्या विरोधात दोन गोल नोंदवून त्याने ८०० गोल चा टप्पा त्याने पार केला. त्याच्या नावावर आता ८०१ गोल नोंद आहेत. ह्या गोलच्या सहाय्याने मैनचेस्टरने आर्सेनलचा ३-२ ने पराभव केला.
रोनाल्डोने दुसऱ्या सत्रातील १० व्या मिनिटाला संघासाठी दुसरा व वैयक्तिक पहिला गोल करत ८०० गोलला गवसणी घातली. त्यानंतर सामन्यातील ७०व्या मिनिटाला मॅनचेस्टरच्या खेळाडूला डेंजर झोनमध्ये अवैद्यारित्या अडवल्यामुळे त्यांना पेनल्टी किकची संधी बहाल करण्यात आली. ही संधी संघाच्या कर्णधाराने रोनाल्डोला दिली, ह्या संधीचा फायदा घेत रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये ८०१ वा गोल नोंद केला.
रोनाल्डोच्या ८०१ गोलमध्ये त्याने, स्पोर्टिंग लिस्बन या क्लबसाठी 5, मैनचेस्टर युनायटेडसाठी १३० गोल, रिअल मद्रिदसाठी सर्वीधिक ४५० गोल आणि यूवेंटससाठी १०१ गोल केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोर्तुगालसाठी ११५ गोल नोंदवले आहेत.
रोनाल्डो हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणार खेळाडू आहे. त्याने इरानच्या अली देईच्या नावावर असणारा सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावे केला. त्याच्या नावे आता सर्वाधिक ११५ गोल आहेत. आताचा काळात खेळणारा कोणताही खेळाडू १०० गोलच्या जवळपास नाही आहे. रोनाल्डोच्या मागोमाग ८० गोल सोबत भारताचा स्टार खेळाडू सुनिल छेत्री आहे तर त्याच्या मागे यावर्षींची फुटबॅालमधील महत्वाचा पुरस्कार बॅलोन डी ओर विजेता खेळाडू लियोनेल मेसी आहे.