…तर त्या दिवशी मी निवृत्त होईन : रोहित शर्मा

…तर त्या दिवशी मी निवृत्त होईन : रोहित शर्मा

भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा 4-1 असा पराभव करत कसोटी मालिकेवर कब्जा केला. मालिकेत रोहित शर्माने 'लिडिंग फ्रॉम द फ्रंट' असे नेतृत्व केले. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर युवा संघाला हाताशी घेऊन हिटमॅनने मालिका जिंकून दाखवली. पाचवा कसोटी सामना झाल्यावर रोहित शर्माला त्याच्या निवृत्तीबाबत विचारण्यात आले त्यावेळी त्याने भन्नाट उत्तर देत सर्व टीकाकारांचे तोंड बंद केले.

पाचवा कसोटी सामना जिंकल्यानंतर रोहित म्हणाला की, 'एकेदिवशी मी सकाळी उठल्यावर मला असे वाटेल की मी आता फार चांगला खेळत नाही, मी हा खेळ खेळण्यायोग्य राहिलो नाही, त्याक्षणी मी निवृत्ती घेईन. त्यावेळी मी फक्त सर्वांना सांगून टाकेन. मात्र, मला गेल्या दोन ते चार वर्षांपासून माझी कामगिरी उंचावली असल्याचे मला वाटते. मी सध्या माझे बेस्ट क्रिकेट खेळत आहे.'

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, 'मी आकड्यांकडे पाहणारा खेळाडू नाही. मोठ्या धावा करणे आणि ती आकडेवारी महत्त्वाची असते. मात्र, खेळाडू त्यांच्या नैसर्गिक खेळ खेळतील कल्चर संघात तयार केले आहे. तुम्ही पाहिलं असेल की संघातील खेळाडू हे जाऊन खुलेपणाने आपलं क्रिकेट खेळत आहेत. आम्ही संघातून माईलस्टोन अन् आकडेवारी काढून टाकली आहे.'

'खेळाडू आता आकड्यांसाठी खेळत नाहीत. ते त्यांची वैयक्तिक धावसंख्या पाहत नाहीत. सामना खेळत राहा, आकडेवारी आपोआप सुधारत जाईल. जर तुम्ही बिनधास्तपणे खेळाल, तुमची मानसिकता स्पष्ट असेल तर इतर गोष्टी आपोआपच होतात.'

रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याबद्दलदेखील बोलला. तो म्हणाला की, आम्ही इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी हरलो, मात्र त्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी कसोटी जिंकलो. दक्षिण आफ्रिकेत आम्हाला फक्त 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायला मिळाली याबद्दल मी नाराज आहे.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news