Nakhrewali Song : गायक रोहित राऊतच्या आवाजातील ‘नखरेवाली’ गाण्याचा धुमाकूळ (Video)

नखरेवाली गाणे
नखरेवाली गाणे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येकाच्या आयुष्यात एक नखरेवाली किंवा एखादा नखरेवाला व्यक्ती असतोच. गायक रोहित राऊत आणि संगीतकार प्रशांत नाकती घेऊन येत आहेत एक गावरान मराठमोळ गाणं 'नखरेवाली'. या गाण्याच्या हूकस्टेप अगदी मनात बसणाऱ्या आहेतच. शिवाय हे गाणं ऐकल्यावर पाय आपोआप थिरकायला देखील लागतात. या गाण्यात निक शिंदे, रितेश कांबळे, अनुश्री माने आणि जाऊ बाई गावात या मराठी रिॲलिटी शोची फायनलिस्ट अंकिता मेस्त्री हे कलाकार आहेत. (Nakhrewali Song) गायक रोहित राऊत सोबत गायिका सोनाली सोनवणे हिने गाण्याला स्वरसाज दिला आहे. या गाण्याचं संगीत प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी केलं आहे. या गाण्याचं दिग्दर्शन रोहित जाधव याने केलं असून या गाण्याचं छायाचित्रीकरण सुरज राजपुत याने केलं आहे. अभिनेता विशाल निकम, गायक रोहित राऊत, गायिका जुईली जोगळेकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे खासगी सचिव अविनाश सोलवट आणि अन्य कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीत या गाण्याचा प्रीमियर सोहळा नुकताच पार पडला. (Nakhrewali Song)

गायक रोहित राऊत 'नखरेवाली' गाण्याविषयी सांगतो, जेव्हा प्रशांत सरांचा मला कॉल आला तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण मराठी म्युझिक अल्बम इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात टॉपची गाणी प्रशांत सरांची असतात. त्यांच्यासोबत माझं हे पहिलचं गाणं आहे.

हे गाणं रेकॉर्ड करतानाही मला खूप मज्जा आली. हे गाणं खूप एनर्जेटिक झालं आहे, त्यामुळे प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच आवडेल.

संगीतकार प्रशांत नाकती गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, "नखरेवाली हे गावरान मराठमोळ एक लव्ह साँग आहे. मुलींचा निरागस आणि सोज्वळ नखरा टिपणार हे गाणं आहे. या गाण्याचं चित्रीकरण नाशिकच्या एका सुंदर गावात झालेलं आहे. आजचा काळ मॉडर्न झाला आहे, तरीपण गावकडचं निरागस प्रेम वेगळ्या रीतीने मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. गाण्यातील चारही कलाकार उत्तम डान्सर आहेत. हे गाणं ऐकल्यावर आपोआप पाय थिरकू लागतील."

पुढे तो सांगतो, "दरवर्षी पाच मार्चला २०२१ पासून गाणं प्रदर्शित करत आहे. २०२१ ला मी केलेलं माझी बायगो हे गाणं सगळ्यात हिट गेलं. त्याचे आता १५० मिलियन व्ह्युज आहेत तर २०२२ ला मी केलेलं आपलीच हवा या गाण्याला एका दिवसात सगळ्यात जास्त व्ह्युज मिळाले होते. त्यानंतर २०२३ ला हार्टब्रेक झाला, हे त्यावर्षातल माझं सगळ्यात हिट गाणं होत. यावर्षी २०२४ ला मी मराठी म्युझिकवर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी 'नखरेवाली' हे गाणं घेऊन आलो आहे. या गाण्यावर प्रेक्षक मायबाप सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप प्रेम देत आहेत. त्यांचं असचं प्रेम कायम मिळो."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news