रोहित पवार ‘ईडी’ कार्यालयात दाखल

रोहित पवार ‘ईडी’ कार्यालयात दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणात आज (दि.२४) 'ईडी'कडून चौकशी केली जाणार आहे. चौकशीदरम्यान आपण तपास यंत्रणेला सहकार्य करणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ईडी कार्यालयात जाण्याआधी रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. रोहित यांची 'ईडी'कडून चौकशी सुरू असताना शरद पवार हे पक्षाच्या कार्यालयात चौकशी पूर्ण होईपर्यंत बसून राहणार आहेत.

सध्याचे सुडाचे राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत 'ईडी'ने काही चुकीची कारवाई केली, तर कोणीही घाबरून जाऊ नये. उलट महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभे राहावे. माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडे राजकारण न समजण्याच्या पलीकडचे आहे; पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. माझ्यासोबत सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवार येत आहेत. वय झाले म्हणून काय झाले. वय झालेली माणसे तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल, तर आणखी काय हवे, असे रोहित पवार मंगळवारी म्हणाले होते. आज इडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना "मी पळून जाणार नाही, लढणार आहे. चूक केली नाही मग घाबरायचे कशाला. ईडी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असून अधिकाऱ्यांनी मगितलेली सर्व कागदपत्रे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news