Rohit Pawar: लढा ‘सत्तेचा’ नाही तर ‘सत्याचा’- आमदार रोहित पवार

Rohit pawar baramati agro
Rohit pawar baramati agro

पुढारी ऑनलाईन डेस्क: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो प्रकल्पावरील बंदी रद्द करत मुंबई उच्च न्यालयाने त्यांना मोठा दिलासा दिला. या निर्णयावर केवळ द्वेश भावनेतून ही नोटीस बजावल्याचे म्हणत, पवार यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. या संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या अधिकृत 'X' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून केली आहे. (Rohit Pawar)

रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अन्यायाविरोधात जेव्हा न्यायव्यवस्थेकडून न्याय मिळतो, तेव्हा लढण्यासाठी अधिक बळ मिळतं. हेच या निकालाने दाखवून दिलं आहे. त्यामुळे हा लढा 'सत्तेचा' नाही तर 'सत्याचा' आहे आणि सत्याची हार कधीच होत नाही, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. (Rohit Pawar)

आमदार पवार यांच्या मालकीचा बारामती ॲग्रो औद्योगिक प्रकल्प ७२ तासांत बंद करण्याचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) निर्णय दिला होता. काल झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने हा निर्णय अवाजवी असल्याची टिप्पणी केली. तसेच प्रकल्पबंदीची नोटीस न्यायालयाने रद्दबातल ठरवली. यामुळे आमदार रोहित पवार यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. (Rohit Pawar)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news