पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज ( दि. ९) विरोध केला. निवडणुकीसाठी प्रचार करणे हा मूलभूत अधिकार मूलभूत नाही, असे ईडीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर शुक्रवार, १० मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी एक दिवस आधी ईडीचे उपसंचालक भानू प्रिया यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
"निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा अधिकार हा मूलभूत, घटनात्मक किंवा कायदेशीर अधिकार नाही. ईडीच्या माहितीनुसार, कोणत्याही राजकीय नेत्याला उमेदवार नसतानाही प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला नाही," असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.