पुणे : आरटीओ कार्यालयासमोर रिक्षाचालकांचा चक्काजाम; शहरात रिक्षांचा शुकशुकाट

पुणे : आरटीओ कार्यालयासमोर रिक्षाचालकांचा चक्काजाम; शहरात रिक्षांचा शुकशुकाट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बेकायदा रॅपिडो बाईक टॅक्सी बंदच्या मागणीसाठी संगम ब्रिज येथील आरटीओ कार्यालयासमोर रिक्षा चालकांनी चक्काजाम केला आहे. त्यामुळे उपनगरात तुरळक रिक्षा पाहायला मिळत आहे. परिणामी,पुणेकर प्रवाशांचे हाल होत आहेत. मागील दोन आठवड्यापूर्वी (दि.28) रोजी पुण्यात चक्काजाम आंदोलन केले होते. यात हजारोंच्या संख्येने पुण्यातील रिक्षाचालक सहभागी झाले होते. या चक्काजाम आंदोलनामुळे पुणेकर प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली होती.

त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाईक टॅक्सी बंद करण्याबाबत दिलेल्या आश्वासनानंतर रिक्षाचालकांनी 12 डिसेंबरपर्यंत संप मागे घेतला होता. मात्र, अद्यापपर्यंत बाईक टॅक्सी बंद करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आज 12 डिसेंबर रोजीपासून रिक्षाचालक आपले चक्काजाम आंदोलन अगोदरपेक्षा तीव्र स्वरूपात करत आहेत. बाईक टॅक्सी कृती समितीतील 16 रिक्षा संघटनांचे रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी झाले आहे. त्यामुळे संगम ब्रिज पासून वाकडेवाडी एसटी स्टँड पर्यंत हजारो रिक्षांच्या रांगा लागल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news