Rhea Chakraborty : … अन् रिया चक्रवर्ती चांगलीच भडकली

Rhea Chakraborty
Rhea Chakraborty
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इराने नुकतेच बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्याशी लग्नगाठ बांधली. यानंतर मुंबईत जंगी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींसह राजकीय मंडळींनीही हजेरी लावली होती. रिसेप्शन पार्टीला अभिनेत्री रिया चक्रवर्ती ( Rhea Chakraborty ) तिच्या भावासोबत पोहोचली होती. पापाराझींसमोर तिने भाऊ शौविकसोबत फोटोसाठी पोझही दिली; मात्र यावेळी काही विपरीतच घडले. त्यामुळे रियाचा राग अनावर झाला आणि तिने पापाराझींना खडे बोल सुनावले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या 

रिया तिच्या भावासोबत पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देत असते. यावेळी नेहमीप्रमाणे पापाराझी त्यांना विविध पोझ देण्यासाठी सांगत असतात. याचवेळी एक फोटोग्राफर रियाला म्हणतो, 'चांगली जोडी आहे.' हे ऐकल्यानंतर त्याच्या बाजूला उभा असलेला फोटोग्राफर त्याला सांगतो की, हा रियाचा भाऊ आहे. चूक समजताच संबंधित फोटोग्राफरने रियाची तत्काळ माफी मागितली. त्यानंतर तिथून जात असताना रिया म्हणते की, अशा लोकांमुळेच अफवा पसरतात, रियाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ( Rhea Chakraborty )

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news