Revolver Prabal | भारताची पहिली लाँग रेंज रिव्हॉल्व्हर ‘प्रबल’ आज होणार लॉन्च, जाणून घ्या काय आहे त्यात खास?

Revolver 'Prabal'
Revolver 'Prabal'
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील पहिली लाँग रेंज रिव्हॉल्व्हर 'प्रबल' ही आज (दि.१८ ऑगस्ट) लॉन्च होत आहे. भारताची ही खास रिव्हॉल्व्हर सरकारी मालकीची कंपनी Advanced Weapons and Equipment India Limited (AWEIL), कानपूर ने तयार केलेली आहे. साइड स्विंग सिलिंडर असलेली 'प्रबल' ही भारतातील पहिली रिव्हॉल्व्हर आहे. ही रिव्हॉल्व्हर ५० मीटपरेक्षा लांबचे लक्ष्य गाठू (Revolver 'Prabal') शकते, हे याचे खास वैशिष्ट्य आहे.

Revolver 'Prabal': काय आहे खासियत?

रिव्हॉल्व्हरच्या मागील आवृत्तीत, काडतुसे घालण्यासाठी बंदूक दुमडली जायची. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व रिव्हॉल्व्हरची रेंज केवळ 20 मीटरपर्यंत आहे. पण सध्या भारतात नव्याने लॉन्च होणाऱ्या 'प्रबल' या रिव्हॉल्व्हरची रेंज 50 मीटरपर्यंत आहे. तिचे वजन फक्त 700 ग्रॅम (काडतुसेशिवाय) असून, ती वजनाने हलकी आहे. तसेच या रिव्हॉल्व्हरला बॅरलची लांबी 76 मिमी आहे. तर 'प्रबल' या भारताच्या लाँग रेंज रिव्हॉल्व्हरची एकूण लांबी 177.6 मिमी आहे. प्रबलचा ट्रिगर खेचणेही खूप सोपे आहे. हे महिलांसाठी एक सुलभ पर्याय बनवते जे ते सहजपणे त्यांच्या हँडबॅगमध्ये ठेवू शकतात आणि संरक्षणासाठी (Revolver 'Prabal') देखील वापरू शकतात.

आजपासूनच करता येणार बुकिंग

प्रबलचे बुकिंग आज १८ ऑगस्टपासून सुरू होणार असून, केवळ परवानाधारक नागरिकच ते खरेदी करू (Revolver 'Prabal') शकतात. AWEIL ही कानपूर येथे संरक्षण उत्पादने तयार करणारी सरकारी कंपनी आहे. यात पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या (OFB) आठ कारखान्यांचा समावेश आहे आणि प्रामुख्याने भारतीय सशस्त्र दल, परदेशी सैन्य आणि देशांतर्गत नागरी वापरासाठी लहान शस्त्रे आणि तोफा तयार करते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news