मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनविण्याचा संकल्प करा ; खासदार सुजय विखे यांचे आवाहन

मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनविण्याचा संकल्प करा ; खासदार सुजय विखे यांचे आवाहन

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  समाज भाषणातून नव्हे, तर कृतीतून बदलतो. देशाचे नाव मोठे करताना प्रत्येकाला आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. दिव्यांग बांधवांना हे जीवन जगण्याचा अधिकार मिळावा, याचा विचार करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच प्रधानमंत्री करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
शेवगाव येथे दिव्यांगाना निःशुल्क सहायक उपकरण साहित्याचे खासदार डॉ. विखे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी आमदार मोनिका राजळे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बापूसाहेब भोसले, ताराचंद लोढे, नितीन काकडे, तुषार वैद्य, आशुतोष डहाळे, अमोल सागडे, नगरसेवक सागर फडके, महेश फलके, भीमराज सागडे, तुषार पुरनाळे, बाळासाहेब कोळगे, गणेश कराड, कमलताई खेडकर, उषा कंगनकर आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

खासदार विखे म्हणाले, देशाच्या स्वातत्र्यानंतर प्रथमच राजकारणापलिकडे जाऊन दिव्यांगांना जीवदान देण्याचे काम प्रधानमंत्री मोदी यांनी केले. देशाच्या प्रत्येक संकटात देशाचा नागरिक सुखमय राहावा, हा त्यांचा दृष्टीकोन आहे, हे साहित्य देताना मिळणारे सर्वात मोठे पुण्य हाच माझा स्वार्थ आहे. या पुण्यात भाजपचे सर्व नागरिक सहभागी आहेत, याचे सर्व श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आहे.
आम्ही फक्त निमित्त आहोत, असे सांगून डॉ. विखे म्हणाले, तुम्ही निवडून दिलेला खासदार देशाच्या सर्व खासदारांपैकी पहिल्या दहा खासदारांत नामाकिंत होता हे तुमचे आशीर्वाद आहेत. तुमच्या आशीर्वादाने खासदार झालो, त्याची परतफेड करण्याची माझी नैतिक जबाबदारी असल्याची जाणीव खासदार विखे यांनी यावेळी करून दिली.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून शासकीय योजनेचा लाभ मिळून देण्याचे आपण प्रयत्न केले. वाळू तस्करातील भ्रष्टाचाराचे चित्र बदलण्याची गरज आहे. वाळूतून मिळालेल्या पैशाने समाज उद्ध्वस्त झाला, गुन्हेगारी वाढली. आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी 600 रुपये ब्रॉस वाळूचा निर्णय घेतला. त्यामुळे वाळू तस्करीला काही प्रमाणात आळा बसला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news