Republic Day 2024: ‘शंख, नादस्वरम…’ प्रथमच १०० महिलांनी भारतीय वाद्ये वाजवून केली परेडची सुरूवात

Republic Day 2024
Republic Day 2024

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रथमच १०० हून अधिक महिला कलाकारांनी भारतीय वाद्ये वाजवून परेडची घोषणा केली. या कलाकारांच्या संख, नादस्वरम, नगाडा इत्यादी संगीताने परेडची सुरुवात होत आहे. या माध्यमातून 'आवाहन' करत, परेडची सुरुवात करण्यात आली. (Republic Day 2024)

या १०० महिलांच्या घोषणापथकाने भारतीय वाद्ये वाजवून पथसंचलनाची सुरुवात केली. या महिला कलाकारांनी शंख, नादस्वरम, नगारा इत्यादी वाद्य संगीत वाजवत संचलनाची सुरुवात केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कर्तव्यपथावर राष्ट्रध्वज फडकावला. त्यानंतर राष्ट्रगीत आणि २१ तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर परेडची सुरुवात झाली. दरम्यान फ्रेंच सेनेने देखील कर्तव्यपथावर संचलन केले. (Republic Day 2024)

कर्तव्यपथावर पथसंचलनामध्ये पहिल्यांदाच तिन्ही संरक्षण दलातील महिलांच्या एकत्र तुकडीचा सहभाग देखील पाहायला मिळणार आहे. महिला वैमानिकही नारी शक्तीचे प्रतिनिधित्व करत हवाई संचलनादरम्यान प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) तुकड्यांमध्ये केवळ महिला जवान असणार आहेत. (Republic Day 2024)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 26 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर भारतीय तिरंगा फडकवला. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हे संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता,  एकता आणि प्रगती यासह वाढत्या स्वदेशी क्षमतांच्या पाठबळाने निर्माण झालेले लष्करी सामर्थ्य आणि वृद्धिंगत होणाऱ्या नारी शक्तीचे दर्शन घडवण्यासाठी कर्तव्यपथ सज्ज आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news