Allergy : काही पथ्ये पाळा,अ‍ॅलर्जीला टाळा! जाणून घ्‍या सविस्‍तर

Allergy : काही पथ्ये पाळा,अ‍ॅलर्जीला टाळा! जाणून घ्‍या सविस्‍तर
Published on
Updated on

बर्‍याच वस्तू आणि औषधांच्या अ‍ॅलर्जीचा त्रास ठराविक जणांना होत असतो, पण काही पथ्ये पाळल्यास अ‍ॅलर्जीचा त्रास कमी होऊ शकतो. (Allergy) पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कशा कशाची अ‍ॅलर्जी आहे, हे जाणून घेतले पाहिजे.(Allergy) जाणून घेवूया ॲलर्जीचा त्रास टाळण्‍यासाठी काेणती पथ्‍ये पाळावीत याविषयी…

  • रात्री जागरण तर दिवसा झोप टाळावी.
  • अति थंड वातावरणाचा सहवास टाळावा. धूळ, उग्र गंध, सुगंधी द्रव्ये टाळावीत.
  • पंख्याचा वापर विशेषत: रात्री पंखा टाळावा.
  • मलमूत्र विसर्जनासाठी टाळाटाळ करू नये.
  • दही, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न, मोड आलेले कडधान्य, हरभरा तसेच उडीद डाळीचा वापर, कच्चे सॅलड, साबूदाणा, पोहे, चहा, कॉफी, मांसाहार, बेकरी पदार्थ फास्ट फूड इत्यादींचा वापर टाळावा.
  • भूक लागेल त्याप्रमाणे आहार सेवन करावे. अति प्रमाणात आहार सेवन करू नये.
  • रात्रीच्या आहारात चार घास कमीच घ्यावेत. आहारापेक्षा फळांचा वापर जास्त करावा.
  • तहान जशी लागेल त्याप्रमाणे पाणी प्यावे. अति प्रमाणात पाणी पिऊ नये.
  • फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पदार्थ तसेच पाण्याचा वापर टाळावा.
  • मद्यपान, धूम्रपान टाळावे. काही धूम्रपान करणार्‍या लोकांना त्वचेचे विकारही होऊ शकतात.
  • लवकर पचणारे अन्न पदार्थांचा वापर करावा. विशेषत: ज्वारीची भाकरी, मूग डाळीचे वरण, भात, दोडका, भेंडी, पालक, मेथी यांचा दैनंदिन आहारात नियमित वापर करण्याचा प्रयत्न करावा.
  • रोज काही प्रमाणात सुका मेवा वापरावा; परंतु सुका मेवा पाण्यात न भिजवता वापरावा.
  • रुग्णांनी योग्य आहार सेवन केला तसेच औषधांचा नियमित वापर केला तर अ‍ॅलर्जी पूर्णपणे कायमस्वरूपी बरी होते.
  • तुम्हाला कोणत्या क्रीम लावल्यानंतर त्वचेला पुरळ उठणे, त्वचा लाल होणे असे प्रकार घडतात याची चाचणी करा.
  • कॉटनचा कपडा, टेरिकॉट किंवा अन्य सुतामधील कोणत्या कपड्यामुळे त्वचेला खाज सुटते याचे परीक्षण करा. नंतर तो कपडा वापरण्याचे टाळा.
  • काही व्यक्तींना समोरची व्यक्ती सिगारेट ओढत असेल तर डोळे चुरचुरणे, श्वास कोंडणे अशी समस्या उद्भवते. अशावेळी अशा व्यक्तीसमोरून बाजूला जाणेच उत्तम उपाय ठरतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news