Reels Video : रील बनवण्याच्या व्यसनाने घेतला तरुणीसह दोन युवकांचा बळी

Reels Video : रील बनवण्याच्या व्यसनाने घेतला तरुणीसह दोन युवकांचा बळी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Reels Video : रेल्वे ट्रॅकवर रील बनवणे तीघांच्या जीवावर बेतले आहे. रेल्वे ट्रॅकवर रील बनवताना पद्मावत एक्सप्रेसची धडक बसून दोन युवकांसह एका युवतीचा मृत्यू झाला. ही घटना गाजियाबादच्या मसूरी भागातील डासना क्रॉसिंगवर घडली.
Stunts for Reel : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन युवक आणि एक युवती येथील रेल्वे ट्रॅकवर रील बनवत होते. त्यावेळी पद्मावत एक्सप्रेसची तिघांना धडक बसली. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

Reels Video : गाजियाबादच्या डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रात्री 9 वाजता, मसूरी येथून माहिती मिळाली की तिघांना ट्रेनची धडक बसली आहे. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांना तिथे तीन मृतदेह आढळले. ज्यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

त्यांनी असेही म्हटले आहे की, व्हिडिओ बनवताना त्यांनी ट्रेन येत असल्याचे पाहिले नाही. ज्यामुळे ट्रेनची धडक बसून त्यांचा मृत्यू झाला आहे. या तिघांची अद्याप ओळख पटलेली नाही.

Reels Video : सोशल मीडियाचे जसे चांगले फायदे आहेत तसेच तोटे ही आहेत. आजमितीला भारतातील अनेक तरुणांमध्ये रील बनवण्याची प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. किंबहुना अनेकांना सातत्याने सोशल मीडियावर सक्रिय राहून सतत फोटो, व्हिडिओ अपलोड करून लाइक्स कमेंट्स मिळवण्याचे व्यसन लागले आहे. अधिकाधिक लाइक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या स्टंटबाजी करताना दिसतात. मात्र, अशीच स्टंटबाजी अनेकदा अनेकांच्या जीवावर बेतते आणि त्यांना आपला जीव गमवावा लागतो. ही घटना देखील याच प्रकारात मोडते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news